Wednesday, 1 January 2014

श्री प्रसाद देव यांनी पाँली हाउस आणि नेट हाउस

श्री प्रसाद देव यांनी पाँली हाउस आणि नेट हाउस च्या माध्यमातून फुलशेती करण्याचे तंत्र विषद केल. शेतकर्यांनी विशिष्ट पद्धतीने प्रशिक्षण घेऊन योग्य ते तंत्र आत्मसात केल्यास किफायतशीर फुल शेती करणे अत्यंत सोपे असल्याचे सांगितले.
सौ. यामिनी महल्ले यांनी आपण परदेशातील नोकरी सोडून शेती करण्या मागील उद्देश विषद करतांना असलेला आत्मविश्वास आणि परमपरेने आलेले ज्ञान याच्या पाठींब्यावर गाई पासून शांपू, साबण, आणि इतर पदार्थ बनून आणि याचे प्रशिक्षण देऊन इतर महिलांना उद्योग निर्मिती केली असल्याचे सांगितले.

गृह विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या सौ. विशाला पटनम

गृह विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या सौ. विशाला पटनम यांनी महिला सबलीकरणासाठी त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक विकासाची गरज प्रतिपादित केली. घरातील स्त्री पुरुष भेदभावापासूनच महिलावर अन्याय सुरु होतो. घरात मारहाण आणि छळ सुरु होतो. याला प्रतिकार करण्याचे शिकले पाहिजे आणि घराच्या प्रत्तेक सुख आणि दुखात एक घटक म्हणून सहभागी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. लहान मुलांचा विकास पहिल्या ४ वर्षापर्यंत होत असून त्याच कालावधीत त्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगून त्याबाबत विस्तृत चर्चा केली-

कृ.भ.को.चे विभागीय व्यवस्थापक श्री. उंटवाले यांनी शेतकर्यांनी जैविक शेती

कृ.भ.को.चे विभागीय व्यवस्थापक श्री. उंटवाले यांनी शेतकर्यांनी जैविक शेती केली पाहिजे येवर भर दिला. रायझोबियम अॅझेटोबॅकटर पी.एस.बी. यांच्या वापराचे महत्व पटवून दिले. 

नाबार्डच्या विविध योजनाची माहिती

श्री किशोर कुलकर्णी यांनी नाबार्डच्या विविध योजनाची माहिती देऊन शेतकरी मंडळाची  स्थापना करणे आणि त्याची देखभाल करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. नाबार्डच्या ग्रामीण विकासाच्या कार्याबाबत विस्तृत माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत विविध विषयावर प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आपण विविध बँकांच्या अंतर्गत कर्ज घेऊन स्वतःच्या पायावर उभारण्याचे त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी केले.

आवळ्याच्या लागवडीच्या तंत्रज्ञानाबाबत विस्तृत माहिती.........श्री गणेश म्हात्रे

श्री गणेश म्हात्रे यांनी आवळ्याच्या लागवडीच्या तंत्रज्ञानाबाबत विस्तृत माहिती दिली. लागवड करत असतांना सुरुवातीच्या मानसिकते बाबत आपण कसे प्रत्तेक फळ बाग लावण्याचा विचार करत असू आणि त्यात आलेले अपयश त्यांनी सांगितले. आवळा पिकाची निवड करून त्याच्या प्रक्रिया करून आज मी एक यशस्वी उद्योजक बनलो असल्याचे सांगितले.

जनावराची जोपासना करण्याची पद्धती विषद केली.....श्री. माधव गुंटूरे

श्री. माधव गुंटूरे यांनी जनावराची जोपासना करण्याची पद्धती विषद केली. यामध्ये दुध उत्पादन, अझोला, हिरवा चारा उत्पादन करून दुधाचा व्यवसाय करतांना प्रामाणिकपणा जपला आणि जवळपास ८०० ते १००० रुपये प्रती दिन नफा कमवीत असल्याचे सांगितले.