कृषी विज्ञान केंद्र सगरोळी इथे दिनांक २८ व २९
डिसेंबर २०१३ रोजी कृषी तंत्रज्ञान साप्ताह आयोजित करण्यात आला.
याचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट
मायंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्कृती संवर्धन मंडळाचे
चेअरमन श्री. प्रमोद देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा प्रकल्पाचे प्रकल्प
उपसंचालक श्री. एन. के. जवळगावकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. किशोर
कुलकर्णी, जिल्हा परिषदेचा कृषी अधिकारी श्री गोविंद कौलवार, गट शेतीचे प्रणेते
श्री नाथराव कराड, कृषी भूषण श्री गणेश म्हात्रे, शेतीनिष्ट शेतकरी अमृतराव
देशमुख, श्री. माधव गुंडूरे, शेतीनिष्ठ शेतकरी श्री.भारत रानरुई, उद्योजिका सौ.
यामिनी महल्ले पशु संवर्धन विभागाचे सहआयुक्त श्री. एस. बी. खुने, वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी एथील गृह विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी
अधिष्ठाता व प्राचार्या सौ. विशाला पटनम होत्या.तसेच देगलूर, धर्माबाद, बिलोली
तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment