डॉ. मायंदे यांनी उद्घाटन पर भाषणात कृषी
विज्ञान केंद्राच्या उभारणीच्या आवश्यकते बाबत माहिती देऊन कार्यक्षेत्रातील सर्व
शेतकर्यांना एकत्रितपणे चर्चा आणि प्रक्षेत्रावर आयोजित तंत्रज्ञानाची माहित
मिळावी आणि त्याचा प्रचार सर्व जिल्हाभर व्हावा आणि हे काम सगरोळी केंद्र करत
असल्याची खात्री झाली असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. शेतकऱ्यांसाठी
तंत्रज्ञानाची आवड निर्माण करणे आणि त्यासाठी मानसिकता बदलण्याची आवश्यकता
असल्याचे प्रतिपादन करून आजच्या उत्पादकता, पिक लागवड आणि त्याची विक्रीसाठी बाजारपेठ
या सर्वात मोठ्या अडचणी असल्याचे सांगून शेतकर्यांनी सजग होऊन आणि अभ्यास कारून
आपला मार्ग शोधण्याची गरज प्रतिपादन केली. शेतीमध्ये विकास साधायचा असल्यास शेती
उद्योगासाठी आर्थिक पाठबळ वाढविले पाहिजे- शासनाच्या स्तरावर विविध योजना जाहीर
होत असतात त्याची माहिती घेऊन आपल्यासाठी यौग्य असलेल्या तंत्रज्ञानासाठी योग्य
ठिकाणी जसे कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे आणि विविध स्त्रोताचा वापर करावा
असेही त्यांनी सांगितले. आता मजुरांचा आणि बैलाची कमतरता पाहता अत्याधुनिक कृषी
औजाराचा वापर वाढविणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगून यान्त्रीकीकरनाची आवश्यकता
असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment