Wednesday, 1 January 2014
श्री प्रसाद देव यांनी पाँली हाउस आणि नेट हाउस
गृह विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या सौ. विशाला पटनम
कृ.भ.को.चे विभागीय व्यवस्थापक श्री. उंटवाले यांनी शेतकर्यांनी जैविक शेती
नाबार्डच्या विविध योजनाची माहिती
श्री किशोर कुलकर्णी
यांनी नाबार्डच्या विविध योजनाची माहिती देऊन शेतकरी मंडळाची स्थापना करणे आणि त्याची देखभाल करण्याची
आवश्यकता प्रतिपादन केली. नाबार्डच्या ग्रामीण विकासाच्या कार्याबाबत विस्तृत
माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत विविध विषयावर प्रशिक्षण घेऊन
स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आपण विविध बँकांच्या अंतर्गत कर्ज घेऊन स्वतःच्या
पायावर उभारण्याचे त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी केले.
आवळ्याच्या लागवडीच्या तंत्रज्ञानाबाबत विस्तृत माहिती.........श्री गणेश म्हात्रे
श्री गणेश म्हात्रे यांनी आवळ्याच्या लागवडीच्या
तंत्रज्ञानाबाबत विस्तृत माहिती दिली. लागवड करत असतांना सुरुवातीच्या मानसिकते
बाबत आपण कसे प्रत्तेक फळ बाग लावण्याचा विचार करत असू आणि त्यात आलेले अपयश
त्यांनी सांगितले. आवळा पिकाची निवड करून त्याच्या प्रक्रिया करून आज मी एक यशस्वी
उद्योजक बनलो असल्याचे सांगितले.
जनावराची जोपासना करण्याची पद्धती विषद केली.....श्री. माधव गुंटूरे
कापूस लागवडीचा अमृत पॅटर्ण विस्ताराणे .... श्री अमृतराव देशमुख
श्री अमृतराव देशमुख यांनी कापूस लागवडीचा अमृत पॅटर्ण
विस्ताराणे मांडली. यामध्ये पिकाच्या शरीर रचना शास्त्राची सद्याच्या कापूस
परिस्थितीशी सांगड घातली. पाच बाय एक आणि
सात बाय एक फुट अंतरावर लागवडीचे महत्व
विषद करून मागील ३ ते ४ वर्षापासून घेत असल्याचे सांगितले. खत लागवड आणि कीटक
नाशके यांचा वापर करण्याची पद्धती बदलण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
नाथराव कराड यांनी गट शेतीचे केलेल्या प्रयोगाची माहिती
नाथराव कराड यांनी गट शेतीचे केलेल्या प्रयोगाची
माहिती देताना एकत्र येऊन गाव विकासाचे कामे करतांना येणाऱ्या अडचणी आणि एकत्र
चालण्यासाठी लागणाऱ्या गुणांची माहिती दिली. शेती आणि शेती पूरक व्यवसायासाठी
लागणाऱ्या निविष्ठा खरेदी आणि माल विक्री करण्यासाठी पूरक बाबींची पूर्ण माहिती
आणि अनुभव कथन केले. आजच्या काळात आर्थिक नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचो जोड
दिली तरच आपण या स्पर्धेत टिकून राहू शकतो असे स्पस्ष्ट केले.
इंटरनेट माध्यमातून शेतकरी सगरोळी कृषी विज्ञान केंद्राशी जोडणे हा पुढील कार्यक्रम............मा. प्रमोद देशमुख
डॉ. मायंदे यांनी उद्घाटन पर भाषण
डॉ. मायंदे यांनी उद्घाटन पर भाषणात कृषी
विज्ञान केंद्राच्या उभारणीच्या आवश्यकते बाबत माहिती देऊन कार्यक्षेत्रातील सर्व
शेतकर्यांना एकत्रितपणे चर्चा आणि प्रक्षेत्रावर आयोजित तंत्रज्ञानाची माहित
मिळावी आणि त्याचा प्रचार सर्व जिल्हाभर व्हावा आणि हे काम सगरोळी केंद्र करत
असल्याची खात्री झाली असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. शेतकऱ्यांसाठी
तंत्रज्ञानाची आवड निर्माण करणे आणि त्यासाठी मानसिकता बदलण्याची आवश्यकता
असल्याचे प्रतिपादन करून आजच्या उत्पादकता, पिक लागवड आणि त्याची विक्रीसाठी बाजारपेठ
या सर्वात मोठ्या अडचणी असल्याचे सांगून शेतकर्यांनी सजग होऊन आणि अभ्यास कारून
आपला मार्ग शोधण्याची गरज प्रतिपादन केली. शेतीमध्ये विकास साधायचा असल्यास शेती
उद्योगासाठी आर्थिक पाठबळ वाढविले पाहिजे- शासनाच्या स्तरावर विविध योजना जाहीर
होत असतात त्याची माहिती घेऊन आपल्यासाठी यौग्य असलेल्या तंत्रज्ञानासाठी योग्य
ठिकाणी जसे कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे आणि विविध स्त्रोताचा वापर करावा
असेही त्यांनी सांगितले. आता मजुरांचा आणि बैलाची कमतरता पाहता अत्याधुनिक कृषी
औजाराचा वापर वाढविणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगून यान्त्रीकीकरनाची आवश्यकता
असल्याचे सांगितले.
आत्मा प्रकल्पाची माहिती
आत्मा प्रकल्पाचे
प्रकल्प उपसंचालक श्री. एन. के. जवळगावकर यांनी आत्मा प्रकल्पाची माहिती दिली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गट स्थापन करण्यात आले असून त्यांना प्रशिक्षण देऊन
प्रक्रिया आणि इतर शेती पूरक उद्योग सुरु करण्याचे कार्य केले जात आहे तसेच
शेतकर्यांनी शेती उत्पादनावर भर न देता त्याच्या बाजारभाव आणि प्रक्रीयावर भर
द्यावा आणि कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन
केले.
प्रस्थाविकात कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश कुलकर्णी
प्रमुख पाहुन्यांच्या हस्ते विविध कृषी निविष्ठा उत्पादकांनी उभारलेल्या प्रदर्शनीचे उद्घाटन
कृषी तंत्रज्ञान साप्ताह उद्घाटन
कृषी विज्ञान केंद्र सगरोळी इथे दिनांक २८ व २९
डिसेंबर २०१३ रोजी कृषी तंत्रज्ञान साप्ताह आयोजित करण्यात आला.
याचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट
मायंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्कृती संवर्धन मंडळाचे
चेअरमन श्री. प्रमोद देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा प्रकल्पाचे प्रकल्प
उपसंचालक श्री. एन. के. जवळगावकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. किशोर
कुलकर्णी, जिल्हा परिषदेचा कृषी अधिकारी श्री गोविंद कौलवार, गट शेतीचे प्रणेते
श्री नाथराव कराड, कृषी भूषण श्री गणेश म्हात्रे, शेतीनिष्ट शेतकरी अमृतराव
देशमुख, श्री. माधव गुंडूरे, शेतीनिष्ठ शेतकरी श्री.भारत रानरुई, उद्योजिका सौ.
यामिनी महल्ले पशु संवर्धन विभागाचे सहआयुक्त श्री. एस. बी. खुने, वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी एथील गृह विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी
अधिष्ठाता व प्राचार्या सौ. विशाला पटनम होत्या.तसेच देगलूर, धर्माबाद, बिलोली
तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
Subscribe to:
Comments (Atom)
